नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दररोज 40 ते 50 हजार नवे रुग्ण आढळत होते. आता ही संख्या वाढून 80 हजारावर गेली आहे. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 83 हजार 883 नव्या रुग्णांची नोंद झाली असून एकूण कोरोबाधित रुग्णांनी 38 लाखांचा टप्पा पार केला आहे. देशात सर्वांत जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून मृतांची संख्याही सर्वांत जास्त आहे.
गेल्या 24 तासात 83 हजार 883 जणांना संसर्ग; तर 1 हजार 43 जणांचा मृत्यू
देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 38 लाख 53 हजार 407 वर पोहचली आहे. तर 8 लाख 15 हजार 538 सक्रिय रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत 29 लाख 70 हजार 493 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या 24 तासांत 1 हजार 43 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या 67 हजार 376 वर पोहचली आहे.
देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 38 लाख 53 हजार 407 वर पोहचली आहे. तर 8 लाख 15 हजार 538 सक्रिय रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत 29 लाख 70 हजार 493 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या 24 तासांत 1 हजार 43 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या 67 हजार 376 वर पोहचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही आकडेवारी जाहीर केली आहे.
दरम्यान, देशात कोरोना चाचणी घेण्याचा वेग वाढला असून बुधवारी 11 लाख 72 हजार 179 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर आतापर्यंत एकूण 4 कोटी 55 लाख 9 हजार 380 चाचण्या पार पडल्या आहेत. तर जागतिक स्तरावर गेल्या 24 तासांत 2 लाख 76 हजार 862 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 6 हजार 96 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.