गांधीनगर- गुजरातमध्ये कोरोनाची लागण झालेल्या तिघांचा मृत्यु झाला आहे. यात सौदी अरबवरून आलेल्या 85 वर्षीय महिलेसह भावनगर येथील 70 वर्षांच्या वृध्दाचा समावेश आहे. राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या प्रधान सचिवांनी ही माहिती दिली आहे.
COVID - 19 LIVE : राज्यात १२४ रुग्ण, तर श्रीनगरमध्ये एकाचा बळी..
11:39 March 26
गुजरातमध्ये कोरोना संक्रमीत तिघांचा मृत्यु
11:10 March 26
पाकिस्तानमधील कोरोनाच्या रुग्णांमध्ये २१ ते ३० वयोगटातील व्यक्तींचा मोठ्या प्रमाणात समावेश..
इस्लामाबाद - पाकिस्तानमधील कोरोनाग्रस्तांमध्ये २१ ते ३० वयोगटातील व्यक्तींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे, अशी माहिती समोर आली आहे. देशाच्या पंतप्रधानांचे विशेष आरोग्य सहकारी डॉ. झफर मिर्झा यांनी ही माहिती दिली आहे. पाकिस्तानमध्ये सध्या कोरोनाचे १,०२२ रुग्ण आहेत.
10:52 March 26
दिल्लीतील मोहल्ला क्लिनिक डॉक्टरला कोरोनाची लागण, पत्नी आणि मुलगीही कोरोनाग्रस्त..
नवी दिल्ली- दिल्लीमध्ये एका मोहल्ला क्लिनिक डॉक्टरला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. यासोबत आणखी चार लोकांना कोरोना झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील एकूण रुग्णांची संख्या ३६ वर पोहोचली आहे. यासोबतच, मोहल्ला क्लिनिक डॉक्टरच्या पत्नी आणि मुलीलाही कोरोनाची लागण झाली आहे.
या डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या सुमारे ८०० नागरिकांचे १४ दिवसांसाठी विलगीकरण करण्यात आल्याची माहिती दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली आहे.
10:44 March 26
देशातील रुग्णांची संख्या ६४९वर, आतापर्यंत १३ बळी..
नवी दिल्ली- देशात आतापर्यंत कोरोनाचे ६४९ रुग्ण आढळले असून, त्यांपैकी ५९३ अॅक्टिव्ह केसेस आहेत. ४२ जणांवर यशस्वी उपचार झाले आहेत. तसेच, आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
10:28 March 26
स्वतःला कोरोना असल्याच्या संशयातून वृद्धाची आत्महत्या..
बंगळुरू - स्वतःला कोरोना झाल्याच्या संशयातून कर्नाटकातील एका ५६ वर्षीय वृद्धाने आत्महत्या केली आहे. राज्याच्या उडुपी जिल्ह्यामध्ये ही घटना घडली.
10:14 March 26
उत्तरप्रदेशमध्ये चार नवे रुग्ण..
लखनऊ -उत्तरप्रदेशमध्ये कोरोनाचे चार नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये दुबईहून परतलेला एक ३२ वर्षीय व्यक्ती, तसेच ३९ वर्षीय व्यक्ती, ३३ वर्षीय महिला आणि २१ वर्षाच्या एका तरुणीचा समावेश आहे. यामधील तरुणीच्या आई-वडिलांना कोरोनाच्या विषाणूची लागण झाल्याचे आधीच निष्पन्न झाले आहे. किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठाच्या विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. सुधीर सिंह यांनी ही माहिती दिली.
10:09 March 26
मुंबई-ठाण्यात आढळले दोन नवे रुग्ण, राज्यातील संख्या १२४ वर..
मुंबई - ठाणे आणि मुंबईमध्ये कोरोनाचे दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १२४ वर पोहोचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
09:57 March 26
जम्मू-काश्मीरमध्ये कोरोनचा बळी, ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू..
श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये कोरोनामुळे एकाचा बळी गेला आहे. एका ६५ वर्षीय वृद्धाचा श्रीनगर रुग्णालयामध्ये मृत्यू झाला आहे. तसेच, या व्यक्तीच्या संपर्कात असणाऱ्या चार जणांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
09:56 March 26
भंडारा- कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शासनाने विविध प्रतिबंधात्मक कायदे लावले आहेत. या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही पोलिसांची असते. मात्र, ही जबाबदारी पार पडताना पोलिसांना त्यांच्या आरोग्याची पण काळजी घ्यावी लागते. सध्या सुरू असलेला मास्कचा तुटवडा पाहता इतरांवर अवलंबून न राहता, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यावर उपाय शोधत कर्मचाऱ्यांकडूनच मास्क बनवून घेतले आहेत.
वाचा :भंडारा पोलिसांनी स्वतःच बनविले 3000 मास्क... कर्तव्य अन् स्वावलंबनाचा अचूक मेळ
09:55 March 26
मुंबई- कोरोनामुळे टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन वर्षभरासाठी स्थगित करण्यात आल्याचे आयओसीने जाहीर केले. यानंतर आता इंडियन प्रीमियर लीगचा १३ वा हंगाम रद्द करण्यासाठी बीसीसीआयवर सारखा दबाव येत आहे. दुसरीकडे कोरोनामुळे भारतात २१ दिवसांसाठी संचारबंदी लावण्यात आली आहे. सर्व परिस्थिती पाहता आयपीएल रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वाचा :IPL रद्द होण्याच्या मार्गावर, ऑलिम्पिक स्थगितीनंतर लॉकडाउनमुळे दबाव वाढला
09:54 March 26
नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर, देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोल बंद करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली.
वाचा :देशभरातील टोल वसूली तात्पुरती बंद, अत्यावश्यक सेवेत अडथळा नको..
09:54 March 26
मुंबई- जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचे बुधवारी नव्याने 15 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 122 झाली आहे. नव्याने आढळलेल्या 15 रुग्णांपैकी 5 रुग्ण हे सांगली येथील असून इतर 10 रुग्ण हे मुंबई व मुंबई परिसरातील कल्याण डोंबिवली, नवी मुंबई व पनवेल या विभागातील आहेत.
वाचा : बापरे..! महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 122 वर; 12 तासात वाढले 15 रुग्ण
09:38 March 26
कोरोनाचा गोव्यातही शिरकाव, आढळले तीन रुग्ण..
पणजी -गोव्यामध्ये कोरोनाचे तीन रुग्ण आढळले आहेत. यामध्ये २५ आणि २९ वर्षीय तरुणांसह एका ५५ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. २५ वर्षांचा तरुण स्पेन, २९ वर्षीय तरुण ऑस्ट्रेलिया तर ५५ वर्षीय व्यक्ती अमेरिकेहून परतल्याची माहिती मिळता आहे. या तीनही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
09:10 March 26
कोरोनाचा चीनमधील प्रादुर्भाव आटोक्यात आला असला, तरी जगभरात त्याचा कहर सुरूच आहे. इटली आणि फ्रान्समध्ये गेल्या २४ तासांमध्ये प्रत्येकी सुमारे ६०० लोकांचा बळी गेला आहे. तर, भारतातील रुग्णांच्या संख्येनेही सहाशेचा टप्पा ओलांडला आहे.
TAGGED:
live news