हैदराबाद - देशभरात मागील २४ तासांत कोरोनाचे नवे ३ हजार ७२२ रुग्ण आढळून आले आहेत. तर १३४ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७८ हजार ०३ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अद्ययावत आकडेवारी जाहीर केली आहे.
COVID-19: मागील २४ तासांत देशात ३ हजार ७२२ रुग्ण; एकूण बाधित ७८ हजार
एकूण रुग्णांमधील ४९ हजार २१९ अॅक्टिव्ह रुग्ण असून २६ हजार २३५ जण पूर्णत: बरे झाले आहेत. तर २ हजार ५४९ जणांचा मृत्यू झाला आहे.
एकूण रुग्णांमधील ४९ हजार २१९ अॅक्टिव्ह रुग्ण असून २६ हजार २३५ जण पूर्णत: बरे झाले आहेत. तर २ हजार ५४९ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील रुग्णांची संख्या वाढत असल्याने चौथ्यांदा लॉकडाऊन जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, यावेळी नवे नियम सरकारद्वारे जाहीर करण्यात येणार आहेत.
सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. राज्यात २५ हजार ९२२ रुग्ण आढळून आले असून ९७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गुजरामध्ये ९ हजार २६७ रुग्ण आहेत. दिल्लीत ७ हजार ९९८ तर तामिळानाडूत ९ हजार २२७ रुग्ण आढळून आले आहेत.