नवी दिल्ली - देशात कोरोना चाचणी क्षमता आणि प्रयोग शाळा वाढवल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने सांगितले. देशात 24 जूनपर्यंत तब्बल 75 लाख कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर देशातील एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 7 हजार 423 (4.16 टक्के) रुग्णांना 'व्हेंटिलेटर सपोर्ट'ची गरज आहे.
देशात 27 हजार 317 ( 15.34 टक्के )रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर 28 हजार 301 (15.89 टक्के ) रुग्णांना ऑक्सिजन सपोर्टची गरज आहे. तसेच भारताचा रिकव्हरी दर हा 56.71 टक्के आहे. जगातील प्रत्येक लाख लोकसंख्येमागे भारतात सर्वांत कमी मृत्यू झाले आहेत. भारतात कोरोना मृत्यूचे प्रमाण हे दर 1 लाख लोकसंख्येमागे 1 आहे, असे जागतीक आरोग्य संघटनने 22 जूनला प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. तर जागतीक पातळीवर सरासरी 6.4 असे आहे.