नवी दिल्ली - गेल्या २४ तासांमध्ये देशात कोरोनाचे तब्बल १,२११ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या दहा हजारांहून अधिक (१०,३६३) झाली आहे.
यामध्ये ८,९८८ अॅक्टिव रुग्णांचा समावेश आहे. तर आतापर्यंत १,०३५ रुग्णांवरती यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. तसेच, गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाच्या ३१ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील कोरोनाच्या एकूण बळींची संख्या ३३९ वर पोहोचली आहे.