महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोनाबाधितांची संख्या २० लाखांच्या पार ; गेल्या 24 तासांत 62 हजार 538 नव्या रुग्णांची नोंद

देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 लाख 27 हजार 75 झाला आहे. यात 6 लाख 7 हजार 384 अ‌ॅक्टिव्ह केस आहेत. तसेच 13 लाख 78 हजार 106 जण पूर्णत: बरे झाले आहेत, तर 41 हजार 585 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

By

Published : Aug 7, 2020, 11:06 AM IST

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

नवी दिल्ली - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्येही कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत आहे. शुक्रवारी नव्याने आढळलेल्या रुग्णांमुळे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांनी 20 लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 62 हजार 538 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसांत इतके नवे रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ असून आतापर्यंतचा हा आकडाही सर्वांत जास्त आहे.

देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 लाख 27 हजार 75 झाला आहे. यात 6 लाख 7 हजार 384 अ‌ॅक्टिव्ह केस आहेत. तसेच 13 लाख 78 हजार 106 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तर 41 हजार 585 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

अहवालानुसार कोरोना रुग्ण संख्येत भारत सध्या जगात दुसर्‍या स्थानावर आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून गेल्या सहा महिन्यांत भारतातील सहा प्रमुख राज्यांमध्ये एक लाखाहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, दिल्ली आणि उत्तर राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळली आहेत.

महाराष्ट्रात सर्वाधिक 4 लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले असून 16 हजार 792 जण मृत्युमुखी पडले आहेत. तामिळनाडू 2 लाखापेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 4 हजार 571 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिल्लीमध्ये 4 हजार 59 जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर चंदिगड, दादरा आणि नगर हवेली, लडाख, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, सिक्कीम आणि अंदमान व निकोबारमध्ये 1 हजारपर्यंत सक्रिय रुग्ण आहेत.

दरम्यान, देशभरामध्ये आतापर्यंत 2 कोटी 27 लाख 88 हजार 393 कोरोना चाचण्या केल्या आहेत, तर गेल्या 24 तासांमध्ये 6 लाख 39 हजार 42 कोरोना चाचण्या केल्या आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने याबाबत माहिती दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details