नवी दिल्ली - कोरोनावर मात करण्यासाठी जगभरामध्ये युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूच्या प्रसरारामुळे जगावर आरोग्य आणीबाणी आली असून तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. भारतामध्ये 53 लाख कोरोना रुग्ण आढळले असून कोरोना रुग्णसंख्येत ब्राझिलला मागे टाकून भारत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. गेल्या 24 तासांमध्ये भारतात 93 हजार 337 कोरोना रुग्ण आढळले असून 1 हजार 247 जणांचा मृत्यू झाला आहे.
देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 53 लाख 8 हजार 15 वर पोहचली आहे. तसेच विविध रुग्णालयामध्ये 10 लाख 13 हजार 964 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 42 लाख 8 हजार 432 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आतापर्यंत 85 हजार 619 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये सर्वांत जास्त कोरोनाचे बळी गेले आहेत.