नवी दिल्ली - देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी देशातील रुग्णांच्या संख्येने दोन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. काल दिवसभरामध्ये महाराष्ट्रात ८१, तर तामिळनाडू मध्ये ७५ नवे रुग्ण आढळून आले. देशात सध्या कोरोनाचे एकूण २,३०१ रुग्ण आहेत. यांपैकी २,०८८ रुग्ण हे अॅक्टिव आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक (४१६) रुग्ण आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ तामिळनाडू (३०९) आणि केरळचा (२८६) क्रमांक लागतो. देशात आतापर्यंत कोरोनाचे ५६ बळी आढळून आले आहेत. महाराष्ट्रात कोरोनामुळे सर्वाधिक २० बळी आढळून आले आहेत.