नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांनी 54 लाखांचा टप्पा पार केला आहे. देशात गेल्या 24 तासांत एकूण 86,961 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर, 1,130 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 54,87,580 वर गेली आहे तर, देशात आतापर्यंत 87,882 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 54 लाखांच्या पार; एकूण 87,882 मृत्यू
देशातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 54,87,580 वर गेली आहे तर, देशात आतापर्यंत 87,882 बाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 43,96,399 जण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या स्थितीत देशात 10,03,299 अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहीती आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
आतापर्यंत 43,96,399 जण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या स्थितीत देशात 10,03,299 अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली आहे. देशात रविवारी 7,31,534 चाचण्या घेतल्या आहेत. तर, आतापर्यंत 6,43,92,594 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे.
भारतात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढला असून भारताने अमेरिकेला मागे टाकत पहिला क्रमांक मिळवला आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली. जगात भारताचा रिकव्हरी रेट 19%, अमेरिकेचा 18.70 टक्के आणि ब्राझिलचा 16.90 टक्के आहे.