नवी दिल्ली - देशभरात गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ७७३ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ५,१९४ झाली आहे.
देशातील एकूण रुग्णांपैकी ४,६४३ रुग्ण हे अॅक्टिव आहेत. तर आतापर्यंत सुमारे ४०१ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. तसेच, देशात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाच्या ३५ नव्या बळींची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण बळींचा आकडा १४९ वर पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.