महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांसाठी इंदूर पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल - इंदोर पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही लोक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. यावर इंदूर पोलिसांनी एक शक्कल लढवली आहे. त्यांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांना काळ्या रंगाचे मुखवटे आणि काळ्या रंगाची कपडे परिधान करुन रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना घाबरवले.

mp
रस्त्यावर फिरणाऱ्यांसाठी इंदोर पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल

By

Published : Apr 3, 2020, 8:42 PM IST

इंदूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात संचारबंदी करण्यात आली आहे. सासतत्याने लोकांना घरी राहण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. तरीही लोक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. यावर इंदूर पोलिसांनी एक शक्कल लढवली आहे. त्यांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांना काळ्या रंगाचे मुखवटे आणि काळ्या रंगाची कपडे परिधान करुन रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना घाबरवले. तसेत त्यांना घरी बसण्याचे आवाहन केले.

विजय नगर पोलिसांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने ही शक्कल लढवली. पोलिसांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते झोपडपट्ट्या व गर्दीच्या वसाहती असलेल्या ठिकाणी फिरले. तिथे त्यांनी प्रबोधन केले. संचारबंदीच्या काळात सर्वांनी घरी राहण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. इंदूरमध्ये आत्तापर्यंत ८९ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच ५ जणांचा मृत्यूही झाला आहे. २५ मार्चपासून इंदूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details