महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

COVID-19 : भारतातील कोरोना रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी, वाचा एका क्लिकवर.. - कोरोना वायरस अपडेट लाइव

देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 31 हजार 868 झाला आहे, यात 73 हजार 560 अॅक्टिव्ह केस आहेत. तसेच 54 हजार 440 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तर 3 हजार 867 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

State-wise report
State-wise report

By

Published : May 24, 2020, 3:44 PM IST

नवी दिल्ली -भारतातील कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ असून परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. देशातील कोरोनाबाधितांनी 1 लाखाचा आकडा पार केला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 31 हजार 868 झाला आहे, यात 73 हजार 560 अॅक्टिव्ह केस आहेत. तसेच 54 हजार 440 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तर 3 हजार 867 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

महाराष्ट्रामध्ये 47 हजार 190 कोरोनाबाधित असून 1 हजार 577 जणांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये 15 हजार 512 कोरोनाबाधित तर 103 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गुजरातमध्ये 13 हजार 664 कोरोनाबाधित असून 829 जणांचा मृत्यू झाला आहे. या पाठोपाठ दिल्लीमध्ये 12 हजार 910 कोरोनाबाधित तर 231 जणांचा मृत्यू झाला आहे.

सध्या सोशल डिस्टन्सिंग हाच कोरोनासाठी रामबाण उपाय आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनचे दिवस जसजसे वाढत चालले आहेत, तसे लोकांचा धीर सुटत चालला आहे. अनेक ठिकाणी सोशल डिस्टनसिंगचे नियम डावलून लोकं रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसतात.

ABOUT THE AUTHOR

...view details