महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

COVID-19 : भारतातील कोरोना रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी, वाचा एका क्लिकवर..

महाराष्ट्रामध्ये 19 हजार 63 कोरोनाबाधित असून 731 जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये 7 हजार 402 कोरोनाबाधित असून 449 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये 6 हजार 318 कोरोनाबाधित तर 68 जणांचा मृत्यू झाला आहे. यापाठोपाठ तामिळनाडूमध्ये 6 हजार 9 कोरोनाबाधित असून 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

COVID-19 India tracker: State-wise report
COVID-19 India tracker: State-wise report

By

Published : May 9, 2020, 12:25 PM IST

नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोनाने थैमान घातले असून भारतामध्येही कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे. आतापर्यंत देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 59 हजार 662 झाला आहे, यात 39 हजार 834 अॅक्टिव्ह केस आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर 17 हजार 849 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तसेच 1 हजार 981 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

भारतातील कोरोना रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी

महाराष्ट्रामध्ये 19 हजार 63 कोरोनाबाधित असून 731 जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये 7 हजार 402 कोरोनाबाधित असून 449 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये 6 हजार 318 कोरोनाबाधित तर 68 जणांचा मृत्यू झाला आहे. यापाठोपाठ तामिळनाडूमध्ये 6 हजार 9 कोरोनाबाधित असून 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कधी संपते कोरोना साखळी -

एका कोरोनाग्रस्तापासून दुसऱ्या व्यक्तीला लागण होण्याची साखळी तोडण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. एखाद्या भागात 28 दिवसात एकही नवी कोरोनाची केस आढळली नाही, आणि शेवटी आढळलेल्या रुग्णाची चाचणी निगेटिव्ह आली तर रुग्णांची साखळी तुटली असे समजण्यात येते.

ABOUT THE AUTHOR

...view details