महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

COVID-19 : भारतातील कोरोना रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी, वाचा एका क्लिकवर.. - active cases

महाराष्ट्रामध्ये 17 हजार 974 कोरोनाबाधित असून 694 जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये 7 हजार 112 कोरोनाबाधित असून 425 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये 5 हजार 980 कोरोनाबाधित तर 66 जणांचा मृत्यू झाला आहे. यापाठोपाठ तामिळनाडूमध्ये 5 हजार 409 कोरोनाबाधित असून 37 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

By

Published : May 8, 2020, 1:38 PM IST

नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोनाने थैमान घातले असून भारतामध्येही कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे. आतापर्यंत देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 56 हजार 342 झाला आहे, यात 37 हजार 916 अॅक्टिव्ह केस आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर 16 हजार 539 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तसेच 1 हजार 886 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

भारतातील कोरोना रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी

महाराष्ट्रामध्ये 17 हजार 974 कोरोनाबाधित असून 694 जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये 7 हजार 112 कोरोनाबाधित असून 425 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये 5 हजार 980 कोरोनाबाधित तर 66 जणांचा मृत्यू झाला आहे. यापाठोपाठ तामिळनाडूमध्ये 5 हजार 409 कोरोनाबाधित असून 37 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोना रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी

कधी संपते कोरोना साखळी -एका कोरोनाग्रस्तापासून दुसऱ्या व्यक्तीला लागण होण्याची साखळी तोडण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. एखाद्या भागात 28 दिवसात एकही नवी कोरोनाची केस आढळली नाही, आणि शेवटी आढळलेल्या रुग्णाची चाचणी निगेटिव्ह आली तर रुग्णांची साखळी तुटली असे समजण्यात येते.

ABOUT THE AUTHOR

...view details