नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोनाने थैमान घातले असून भारतामध्येही कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे. आतापर्यंत देशभरात एकूण 12 हजार 380 रुग्ण आढळले असून, यांपैकी 10 हजार 477 अॅक्टिव्ह केसेस आहेत. देशातील एकूण रुग्णांपैकी 1 हजार 489 रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत. तर, 414 जणांचा यात बळी गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रामध्ये 2 हजार 916 कोरोनाबाधित असून 187 जणांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये 1 हजार 242 कोरोनाबाधित असून 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच दिल्लीमध्ये 1 हजार 578 कोरोनाबाधित तर 32 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच राजस्थानमध्ये 1 हजार 23 कोरोनाबाधित आहेत, तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे.