महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

COVID-19 : देशातील कोरोना रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी, पाहा एका क्लिकवर..

देशात आजअखेर कोरोनाच्या ९,१५२ रुग्णांची नोंद झाली आहे. तर, कोरोनाच्या एकूण बळींची संख्या ३०८वर पोहोचली आहे. पाहूयात देशभरातील कोरोना रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी..

COVID-19 India tracker: State-wise report
देशातील कोरोना रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी, पहा एका क्लिकवर..

By

Published : Apr 13, 2020, 10:51 AM IST

नवी दिल्ली - देशात आजअखेर कोरोनाच्या ९,१५२ रुग्णांची नोंद झाली आहे. तर, कोरोनाच्या एकूण बळींची संख्या ३०८वर पोहोचली आहे. पाहूयात देशभरातील कोरोना रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी..

देशातील तीन राज्यांमध्ये एक हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक (१,९८५) रुग्ण आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ दिल्ली (१,१५४) आणि तामिळनाडूचा (१,०४३) क्रमांक लागतो. तसेच, तीन राज्यांमध्ये ५००हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यांमध्ये मध्य प्रदेश (५६४), गुजरात (५१६) आणि तेलंगाणाचा (५०४) क्रमांक लागतो.

देशातील कोरोना रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी...

महाराष्ट्रामध्ये बळींची संख्याही सर्वाधिक (१४९) आहे. त्यापाठोपाठ, मध्यप्रदेश (३६), गुजरात (२५), आणि दिल्लीचा (२४) क्रमांक लागतो. तर, पंजाब आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी ११ बळींची नोंद झाली आहे.

देशातील एकूण रुग्णांपैकी ७,९८७ रुग्ण अ‌ॅक्टिव आहेत. तर आतापर्यंत ८५६ लोकांवरतील यशस्वी उपचार झाले आहेत.

हेही वाचा :ओडिशामध्ये 'ओला' करणार अत्यावश्यक वाहतूक; रुग्णांसह डॉक्टर अन् वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही फायदा..

ABOUT THE AUTHOR

...view details