नवी दिल्ली - गेल्या २४ तासांमध्ये देशात ९०९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या ८,३५६ वर पोहोचली आहे. राज्यनिहाय आकडेवारी पाहता महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडूमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रानंतर दिल्लीनेही हजार रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे.
COVID-19 : पाहा कोरोनाची राज्यनिहाय आकडेवारी, एका क्लिकवर.. - देशातील कोरोना रुग्णांची संख्या
महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १,७६१ वर पोहोचला आहे. दिल्लीमध्ये १,०६९ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, तामिळनाडूमध्ये ९६९ रुग्ण आढळले आहेत.
![COVID-19 : पाहा कोरोनाची राज्यनिहाय आकडेवारी, एका क्लिकवर.. COVID-19 India tracker: State-wise report](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6758601-837-6758601-1586664565112.jpg)
पहा कोरोनाची राज्यनिहाय आकडेवारी, एका क्लिकवर..
महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १,७६१ वर पोहोचला आहे. दिल्लीमध्ये १,०६९ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, तामिळनाडूमध्ये ९६९ रुग्ण आढळले आहेत. तसेच, महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही सर्वाधिक आहे. महाराष्ट्रामध्ये १२७, त्यापाठोपाठ मध्य प्रदेशमध्ये ३६, तर गुजरातमध्ये २२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
हेही वाचा : लॉकडाऊनमुळे गंगा नदीसह इतर नद्यांचे पाणी निर्मळ, पक्ष्यांचा किलबिलाट वाढला