महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गुड न्यूज! कोरोना आटोक्यात, 20 हजार 549 रुग्णांची नोंद - कोरोना रुग्णांची संख्या

देशातील विविध रुग्णालयांमध्ये 2 लाख 62 हजार 272 जणांवर उपचार सुरू आहेत. रिकव्हरी रेट 95.99 वर पोहचला आहे. तर मृत्यू दर 1.45 आहे. राज्यनिहाय आकडेवारी पाहता केरळमध्ये सर्वांत 65 हजार 39 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर महाराष्ट्रात 55 हजार 672 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

By

Published : Dec 30, 2020, 2:21 PM IST

नवी दिल्ली -जगभरामध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे. गेल्या 24 तासात 20 हजार 549 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने एकूण रुग्णसंख्या 1 कोटी 2 लाख 44 हजार 852 वर पोहचली आहे. तर 286 मृत्यू झाल्याने एकूण मृताची संख्या 1 लाख 48 हजार 439 वर पोहचली आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे कोरोना रिकव्हरी रेट वाढला आहे.

देशातील विविध रुग्णालयांमध्ये 2 लाख 62 हजार 272 जणांवर उपचार सुरू आहेत. रिकव्हरी रेट 95.99 वर पोहचला आहे. तर मृत्यू दर 1.45 आहे. राज्यनिहाय आकडेवारी पाहता केरळमध्ये सर्वांत 65 हजार 39 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर महाराष्ट्रात 55 हजार 672 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोना चाचण्यांचा आकडा -

बुधवारी दिवसभरात 11 लाख 20 हजार 281 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. तर आतापर्यंत एकूण 17 कोटी 9 लाख 22 हजार 30 कोरोना चाचण्या पार पडल्या आहेत.

रुग्णांचा वाढता क्रम -

कोरोना रुग्णांनी 7 ऑगस्टला 20 लाख, 23 ऑगस्टला 30 लाख, 5 सप्टेंबरला 40 लाख, 16 सप्टेंबरला 50 लाख, 28 सप्टेंबरला 60 लाख, 11 ऑक्टोंबरला 70 लाख, 29 ऑक्टोबरला 80 लाख आणि 20 नोव्हेंबरला 90 लाखाचा टप्पा पार केला. तर 19 डिसेंबरला एक कोटीचा टप्पा ओलांडला.

हेही वाचा -'जो आमच्या वाटेला जाईल, त्याला सोडणार नाही', चीनला इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details