नवी दिल्ली -जयपूर, दिल्ली आणि तेलंगणानंतर आता गुजरामध्येही कोरोनाचे संशयित आढळले आहेत. अहमदाबादमधील दोन महिलांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यामधील एका महिलेचे वय ६० वर्षे आहे. या दोघींनाही अहमदाबादच्या एसव्हीपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जगभरात थैमान घालणारा कोरोना हा भारतातही पोहोचला आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाचे २९ रूग्ण आढळले आहेत. तसेच देशभरात ठिकठिकाणी संशयित रुग्ण आढळून येत आहेत. याआधी हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनीही राज्यात कोरोनाचे तीन संशयित रुग्ण आढळल्याचे राज्याच्या विधानसभेत सांगितले होते. तसेच, २१४ लोकांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.