काश्मिरमधील विद्यार्थ्यांनी गृह आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयांना आपल्याला बांगलादेश सीमेमार्गे भारतात परत येण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती करणारा व्हिडिओ जारी झाल्यावर, सूत्रांनी ठामपणे सांगितले की त्या विद्यार्थ्यांनी जेथे आहेत तेथेच थांबले पाहिजे. ढाक्यातील उच्चायुक्तालय बांगलादेशात विद्यार्थ्यांसह भारतीयांच्या संपर्कात आहेत आणि त्यांच्या कल्याणासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत, असे परराष्ट्र सचिव हर्ष श्रिंगला यांनी आश्वस्त केले आहे. ईटीव्ही भारतशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
तत्पूर्वी मंगळवारी बांगलादेश सीमेवर अडकलेल्या ७० वैद्यकीय विद्यार्थ्यांचा व्हिडिओ समाजमाध्यमांत फिरत आहे. पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बोनगावनजीक पेट्रापोल-बेनापोल या बंद केलेल्या भारत-बांगलादेश सीमेवरील चौकीवर हे विद्यार्थी अडकले आहेत. एका काश्मिरी तरुणीने सांगितले की आम्हाला या तपासणीनाक्यातून भारतात जाऊ द्यावे, असे आवाहन आम्ही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाक़डे अनेक वेळा केले आहे. आम्हाला येथे मुळीच सुरक्षित वाटत नाही. येथे जमाव आहेत आणि येथे राहून आम्ही आमचा जीव धोक्यात घालत आहोत. आम्ही येथे रात्र घालवण्यास तयार आहोत, असे ही तरूणी व्हिडिओत आवाहन करताना दिसते.
बांगलादेशात विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये काश्मिरातील ७० विद्यार्थी शिक्षण घेतात. आम्ही या पेट्रापोल-बेनापोल सीमेवर अडकलो आहोत. येथे येण्यासाठी आम्ही १२ ते १६ तास प्रवास केला आहे. आमची महाविद्यालये आणि वसतीगृहे बंद आहेत आणि आम्हाला सर्व रिकामे करून घरी परतण्यास सांगितले आहे. आम्ही या सीमेवर काल सायंकाळपासून आहोत आणि आम्ही काहीही खाल्ले नाही. आम्हाल सीमा ओलांडून जोपर्यंत भारतात जाण्याची परवानगी देत नाहीत तोपर्यंत आम्ही येथेच बसून राहणार आहोत, असे दुसऱ्या एका तरुण मुलाने आवाहन केले आहे. परंतु, भारतीय अधिकाऱ्यांनी असे स्पष्ट केले आहे की या क्षणी कुणालाही सीमेच्या माध्यमातून हलवले जाणार नाही. बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान आणि भूतान यांच्यासह सर्व शेजारी देशांशी सीमेवरील चौक्यांचा लॉकडाऊन केलेल्या जमिनीवरील चौक्यांचा समावेश आहे. इतर देशांतून भारतात आणि भारतातल्या भारतातही हालचालींवरील निर्बंधांबाबत सल्ल्यानुसार, सर्व सीमा ओलांडणे स्थगित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना म्हणून त्यांचे आरोग्य, सुरक्षा आणि समुदायाच्या हिताच्या दृष्टिने वस्तीगृहात परतण्याचा सल्ला आहे, असे एका अधिकृत सूत्राने सांगितले. भारतात आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवासावरील निर्बंध अमलात असल्याचा स्पष्ट सल्ला भारतीय उच्चायुक्तालयाने त्यांना दिला असतानाही हे विद्यार्थी सोमवारी रात्री सीमेवरील चौकीवरील पोहचले.