अहमदाबाद - गुजरातमध्ये गुरुवारी एकूण ३१३ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ हजार ३९५ वर पोहोचली आहे. तसेच गुरुवारी १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. एकूण मृतांची संख्या २१४ वर पोहोचली आहे.
एकूण अॅक्टीव्ह केसेस ३ हजार ५६८ असून त्यापैकी ३ हजार ५३५ जणांची प्रकृती चांगली आहे, तर ३३ जणांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. गेल्या ८ दिवसांचा आकडा बघितल्यास दररोज सरासरी १९० कोरोनाबाधितांची भर पडत आहे. गेल्या २२ एप्रिलला १ हजार ५०१ रुग्ण होते. मात्र, ८ दिवसात रुग्ण दुप्पट झाले आहेत. यासोबतच मृतांची संख्या देखील झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.