नवी दिल्ली - केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याविरोधात मुजफ्फरपूरमधील सीजीएम न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या तमन्ना हाश्मी यांनी ही तक्रार दाखल केली आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा काळा बाजार थांबवण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरले असल्याचे याचिकेत म्हटले आहे. संबधfत याचिकेवर 30 मार्चला सुनावणी होणार आहे.
कोरोना दहशत : केंद्रीय आरोग्य मंत्र्यांविरोधात बिहारमध्ये तक्रार दाखल - केंद्रीय आरोग्य मंत्र्यांविरोधात तक्रार दाखल
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याविरोधात मुजफ्फरपूरमधील सीजीएम न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
![कोरोना दहशत : केंद्रीय आरोग्य मंत्र्यांविरोधात बिहारमध्ये तक्रार दाखल केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6457107-thumbnail-3x2-vardhan.jpg)
मास्क , सॅनिटायझरचा काळा बाजार आणि साठेबाजीवरून सामाजिक कार्यकर्त्या तमन्ना हाश्मी यांनी भारतीय दंड विधानातील (आयपीसी) कलम 406,506,420 आणि 120 अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. विभाग मास्क आणि सॅनिटायझरचा काळा बाजार थांबवण्यात केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन अपयशी ठरले आहेत. त्यामुळे सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे, असे तमन्ना हाश्मी यांनी याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवर 30 मार्चला सुनावणी होणार आहे.
जीवघेणा कोरोना विषाणूचा भारतात शिरकाव झाला असून कोरोना बाधित रुग्णाची संख्या 151 वर पोहोचली आहे. तर अनेक जणांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. कोरोना विषाणूमुळे बाजारात मास्क आणि सॅनिटायझरची मागणी वाढली आहे. त्यामुळे मास्क वाजवीपेक्षा जास्त किंमतीमध्ये विकला जात असल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत.