अहमदाबाद(गुजरात) - इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटरने विकसित केलेले आरोग्य सेतू अॅपद्वारे कोविड -19 च्या संसर्गाच्या प्रसाराबद्दल मोबाईलवरून माहिती मिळू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरोग्य सेतू अॅपचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले आहे. यातून प्रेरणा घेऊन अहमदाबादच्या शिल्पा भट्ट यांनी आरोग्य सेतू अॅपच्या लोगोच्या रूपातील चॉकलेट बनवण्याचा विचार केला. यातून त्यांनी सर्व लोकांना घरात राहून सुरक्षित रहाण्याचा संदेश दिला आहे.
अहमदाबादच्या 'या' महिलेने बनवलेय सेतू अॅॅपच्या लोगोच्या रूपातील चॉकलेट - Shilpa bhatt
अहमदाबादच्या शिल्पा भट्ट यांनी आरोग्य सेतू अॅपच्या लोगोच्या रूपातील चॉकलेट बनवण्याचा विचार केला. यातून त्यांनी सर्व लोकांना घरात राहून सुरक्षित रहाण्याचा संदेश दिला आहे.
कोरोना विषाणू संसर्गाची साथ सर्व देशभर पसरली आहे. सध्या त्यावर कोणताही इलाज आढळलेला नाही. यामुळे लोकांनी त्यांच्या घरातच थांबण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यांच्या जवळपास कोरोना विषाणू संसर्गग्रस्त व्यक्ती आहे की नाही, हे तपासण्यासाठी आरोग्य सेतु अॅपचा वापर करत आहेत. यासाठी ते त्यांच्या स्मार्टफोनचे जीपीएस व ब्लूटूथ वापरत आहेत. आरोग्य सेतू अॅपमध्ये या नव्या सुविधेसह भारत सरकारने याची नवीन आवृत्ती आणली आहे. ही कोरोनाविरोधात कवचाप्रमाणे काम करेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.