नवी दिल्ली- गौतम नगर येथील एका ४२ वर्षीय व्यक्तीने एका महिला डॉक्टरवर व तिच्या लहान बहिणीवर हल्ला केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी काल शहरातील न्यायालयाने आरोपीला जामीन देण्यास नकार दिला आहे.
दिल्लीत महिला डॉक्टर आणि तिच्या बहिणीवर हल्ला; न्यायालयाने आरोपीचा नाकारला जामीन - delhi
पेश्याने इंटेरिअर डिझाईनर असलेल्या संजीव शर्माने डॉक्टर महिला व तिच्या बहिणीवर कोरोना विषाणू पसरवत असल्याचा आरोप करत हल्ला केला होता. याप्रकरणी पोलिसांच्या युक्तीवादाला ग्राह्य धरून आणि गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपी संजीवला जामीन नकारला आहे.
८ एप्रिलला रात्री ९.३० च्या सुमारास पीडित डॉक्टर महिला व तिची लहान बहीण घराबाहेर फळभाजी विकत घेत होते. त्यादरम्यान, पेश्याने इंटेरिअर डिझाईनर असलेल्या संजीव शर्माने या दोघा बहिणींवर हल्ला केला. या वेळी त्याने महिला डॉक्टर व तिच्या लहाण बहिणीवर कोरोना विषाणू पसरवत असल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी पोलिसांच्या युक्तीवादाला ग्राह्य धरून आणि गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपी संजीवला जामीन नकारला आहे.
हेही वाचा-संतापजणक..! पोलिसांनी केली डाॅक्टरांना मारहाण... रुग्णालयातून जात होते घरी