नवी दिल्ली : १९९९च्या झारखंड कोळसा घोटाळ्यामध्ये एका माजी केंद्रीय मंत्र्याला तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सोमवारी याबाबत निर्णय दिला. माजी केंद्रीय मंत्री दिलीप रे यांच्यासोबत अन्य दोषींना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
याप्रकरणी सहा ऑक्टोबरला विशेष न्यायमूर्ती भारत पराशर यांनी वाजपेयी सरकारमधील माजी केंद्रीय मंत्री (कोळसा) दिलीप रे यांच्यासह इतर आरोपी कोळसा घोटाळा प्रकरणात दोषी असल्याचा निर्णय दिला होता. दिलीप यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल होते.