नवी दिल्ली - काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत येत्या 30 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे चिंदबरम दिवाळी हा उत्सव तिहार तुरुंगाताच साजरा करणार आहेत.
चिदंबरम तुरुंगातच साजरी करणार दिवाळी, न्यायालयीन कोठडीत 30 ऑक्टोबरपर्यंत वाढ - INX media case
काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत येत्या 30 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
चिंदबरम
पी. चिदंबरम आयएनएक्स माध्यम गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. २१ ऑगस्टला अटक करण्यात आली होती. सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँड्रीन प्रतिबंध कायद्याअंतर्गत त्यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. 'फॉरेन इन्वेस्टमेंट प्रमोशन बोर्डा'मध्ये झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येत आहे.