सिरोही - पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयच्या एजंटसहीत ४ लोकांनी भारतीय हद्दीत प्रवेश केल्याची माहिती गुप्तचर संघटनांना मिळाली आहे. त्यामुळे राजस्थान आणि गुजरात सहीत देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोणत्याही वेळी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राजस्थान व गुजरातसह देशभर हाय अलर्ट; आयएसआयच्या चार लोकांची भारताच्या हद्दीत घुसखोरी - कारवाई
र्दीच्या ठिकाणी सुरक्षा अधीक कडक करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. विशेष ठिकाणी तपास नाके उभारण्यात यावेत. तसेच, वाहने आणि संशयीतांवर पाळत ठेवण्याची सूचना पोलिसांना देण्यात आली आहे.
प्रतिकात्मक छायाचित्र
या व्यक्तींकडे अफगाणिस्तानचा पासपोर्ट आहे. त्यांच्याकडून दहशतवादी कारवाई होण्याची शक्यता आहे. अशी माहिती सिरोहचे पोलीस आयुक्त काल्यामल मीना यांनी दिली. गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा अधीक कडक करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.
विशेष ठिकाणी तपास नाके उभारण्यात यावेत. तसेच, वाहने आणि संशयीतांवर पाळत ठेवण्याची सूचना पोलिसांना देण्यात आली आहे.