महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिल्लीत ५ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त; दोघांना अटक - ५ लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा

आरोपी नुरूल आणि तुलू यांनी कबूल केले की, त्यांचे गाव इनायतपूर आणि अनूपनगर हे भारत-बांग्लादेश आंतरराष्ट्रीय सीमेजवळ असून ते देशविरोधी आणि बेकायदेशीर कार्यात सहभागी आहेत.

नवी दिल्ली
नवी दिल्ली

By

Published : Oct 10, 2020, 10:53 PM IST

नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांनी २ हजार आणि पाचशे रुपयांच्या ५ लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. नुरूल (वय ४०) आणि तुलू शेख (वय ४५) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही पश्चिम बंगालमधील मालदा येथील रहिवासी आहेत.

हे दोघे आरोपी राजाराम कोहली रस्त्यावर नोटा खपवण्याच्या प्रयत्नात होते. विशेष पोलीस पथकाने तेथे पोहचून त्यांना रंगेहाथ अटक केली. भादवि कलम 489 बी/489 सी/120 बी/34 नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौकशी दरम्यान आरोपी नुरूल आणि तुलू यांनी कबूल केले की, त्यांचे गाव इनायतपूर आणि अनूपनगर हे भारत-बांग्लादेश आंतरराष्ट्रीय सीमेजवळ असून ते देशविरोधी आणि बेकायदेशीर कार्यात सहभागी आहेत. यात एफआयसीएनच्या तस्करीचा समावेश आहे. कालीचकचक हे एफआयसीएनच्या तस्करांचे केंद्र बनले आहे. हे लोक त्यांच्या स्त्रोतांकडून एफआयसीएन खरेदी करतात आणि नंतर ते संपूर्ण भारतात पुरवठा करतात, असे विशेष पथकाचे डीसीपी पी.एस.कुशवाहा यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details