देहराडून -कोरोना व्हायरसच्या महामारीचा सामना करण्यासाठी योगगुरु रामदेव बाबा पुढे सरसावले आहेत. बाबा रामदेव यांनी पतंजली योगपीठाकडून योगदान देत पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी २५ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी देशातील अनेक उद्योगपती व अभिनेत्यांबरोबरच अनेक लोकांनी पीएम मदतनिधीसाठी आपले योगदान दिले आहे.
Coronavirus : महामारीविरुद्धच्या लढाईसाठी रामदेव बाबा आले पुढे.. २५ कोटींची मदत - २५ कोटींची मदत
योगगुरु बाबा रामदेव यांनी कोरोना संसर्ग विरुद्ध सुरू असलेल्या लढाईसाठी पतंजली योगपीठकडून महत्वाचे योगदान दिले आहे. बाबा रामदेव यांनी पंतप्रधान सहाय्याता निधीसाठी २५ कोटींचा निधी दिला आहे.
वैश्विक महामारी कोरोना व्हायरसच्या संसर्गाने संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. भारतातही कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा समयी संपूर्ण एकजुटीने या संकटाचा सामना करत आहे. पंतप्रधान मोदींनी कोरोना विरुद्च्या या लढाईसाठी 'पंतप्रधान नागरिक सहाय्यता व मदत कोष' ट्रस्ट ची स्थापना केली आहे. त्यानंतर अनेक लोक मदतीसाठी पुढे आले आहेत.
योगगुरु बाबा रामदेव यांनी कनखल येथील दिव्य योग मंदिर परिसरात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी म्हटले की, पतंजली योगपीठ आणि अन्य प्रकल्पातील कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतनही पीएम सहाय्यता निधीसाठी दिले जाईल.