हैदराबाद-जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्यातच नवी दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझ मधील धार्मिक कार्यक्रमातून झालेल्या कोरोनाच्या प्रसारामुळे देशभरात खळबळ माजली आहे. त्यातच एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे सोशल मिडियावर ते टिकेचे धनी झाले आहेत. ओवैसी यांनी ट्विट केले आहे की, ज्यांचा साथीच्या रोगाने मृत्यू होतो. त्यांना इस्लाममध्ये शहीदांचा दर्जा मिळतो. त्यामुळे तबलीगी मरकझ येथील कोरोना बाधेमुळे मृत्यू झालेल्यांना शहिदांचा दर्जा द्यावा, अशी मागणी त्यानी केली आहे.
तबलिगी मरकझ: कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना शहीदांचा दर्जा द्यावा, ओवैसी यांचे वादग्रस्त वक्तव्य - ओवैसी बातमी
एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ते टीकेचे धनी झाले आहेत.
coronavirus-victims-are-martyrs-owaisi
हेही वाचा-जम्मू-काश्मीरमधील 4-G इंटरनेट सेवा सुरू करावी; सर्वोच्च न्यायालयात याचिका..
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज 10 वा दिवस आहे.