महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 30, 2020, 7:38 AM IST

Updated : Jan 30, 2020, 7:56 AM IST

ETV Bharat / bharat

'कोरोना'चा कहर : चीनमध्ये १७० बळी; सात हजारांहून अधिकांना संसर्ग..

खबरदारीचा उपाय म्हणून भारतात अनेक ठिकाणी संशयित रुग्णांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. केरळमध्ये ८०६ नागरिकांना निरीक्षणाखाली ठेवले गेले आहे. तर, बंगळुरुमध्ये चार चिनी नागरिकांना विशेष कक्षांमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रामध्येही आठ रुग्णांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

coronavirus update 169 dead in china around seven thousand affected so far
'कोरोना'चा कहर : चीनमध्ये १६९ बळी; सात हजारांहून अधिकांना संसर्ग..

बीजिंग -चीनमधील कोरोना विषाणूच्या बळींची संख्या दिवसेंदिवस अधिक वेगाने वाढत चालली आहे. आजपर्यंत तब्बल १६९ जणांचा बळी गेल्याची माहिती मिळत आहे. तर जवळपास आठ हजार लोकांना याचा संसर्ग झाल्याचे समजत आहे.

चीनबाहेर जवळपास ९० लोकांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. अमेरिका, जपान आणि इतर देश चीनमधील आपापल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी पुढे सरसावले आहेत. चीनच्या हुबेई प्रांतातील भारतीय नागरिकांना देशात परत पाठवण्यासाठी चीन सरकारने परवानगी मागितली आहे. यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पार पाडण्यासाठी चीनमधील भारतीय दूतावास चीन सरकारशी बोलणी करत असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी काल (बुधवार) दिली.

दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून भारतात अनेक ठिकाणी संशयित रुग्णांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. केरळमध्ये ८०६ नागरिकांना निरीक्षणाखाली ठेवले गेले आहे. तर, बंगळुरुमध्ये चार चिनी नागरिकांना विशेष कक्षांमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रामध्येही आठ रुग्णांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा : निर्भया प्रकरण; आणखी एका दोषीची राष्ट्रपतींकडे दया याचिका

Last Updated : Jan 30, 2020, 7:56 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details