कोची -जगभरात कोरोना विषाणूची दहशत पसरत असताना आता भारतातही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. आत्तापर्यंत देशात ५७ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. या विषाणूच्या वाढत्या भीतीमुळे सरकारने केरळमध्ये ३१ मार्चपर्यंत सिनेमागृह बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सिंगल स्क्रिन्स, मल्टीप्लेक्सेस सोबतच केंद्रिय बोर्डच्या शाळा देखील काही काळासाठी बंद करण्यात आल्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, मंगळवार पर्यंत कोरोनाचे १२ रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे खबरदारी बाळगण्याचा सूचना दिल्या आहेत.