महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोना दहशत : फारुक अब्दुल्ला यांनी खासदार निधीमधून दिले 1 कोटी रुपये - Farooq Abdullah

जम्मू काश्मीरमध्ये कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते फारुक अब्दुल्ला यांनी शनिवारी खासदार निधीमधून 1 कोटी रुपये दिले आहेत.

Coronavirus, Farooq Abdullah Releases Rs One Cr From His MPLAD Funds To Fight Against Corona
Coronavirus, Farooq Abdullah Releases Rs One Cr From His MPLAD Funds To Fight Against Corona

By

Published : Mar 21, 2020, 11:53 PM IST

श्रीनगर - भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णाची संख्या 294 पेक्षा अधिक झाली आहे. जम्मू काश्मीरमध्ये कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते फारुक अब्दुल्ला यांनी शनिवारी खासदार निधीमधून 1 कोटी रुपये दिले आहेत.

शेर-ए-कश्मीर आयुर्विज्ञान संस्थेसाठी 50 लाख तर मध्य काश्मीरमधील बडगाम आणि गांदरबल जिल्ह्यांसाठी प्रत्येकी 25 लाख रुपये दिले आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वी फारुक अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले होते. जम्मू काश्मीर खोर बंद करण्यात आल्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे राज्यामध्ये 4-जी नेटवर्क सेवा सुरू करण्याची मागणी त्यांनी पत्रामध्ये केली होती.

जम्मू-काश्मीरचे ३ वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या ८३ वर्षीय फारूक यांना त्यांच्या घरीच नजरकैदेत ठेवण्यात आले होते. 16 सप्टेंबरला त्यांच्यावर सार्वजनिक सुरक्षा कायदा (PSA) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. नुकतच अधिकृत आदेश जारी करत फारूक अब्दुला यांची नजरकैदतून सुटका करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details