नवी दिल्ली - कोरोना विषाणूने जगभरामध्ये थैमान घातले आहे. १ लाख ८२ हजार नागरिकांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. तर ७ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार २७ जणांचा मृत्यू आज सकाळपासून झाला आहे.
जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ; भारतातही ३ जणांचा मृत्यू
चीनमध्ये आज १३, अमेरिका ७, दक्षिण कोरिया ६ आणि भारतामध्ये १ व्यक्तीचा कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये ४ हजार ७२७ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. मृतांचा आणि बाधितांचा आकडा सतत वाढत आहे.
चीनमध्ये १३ जण, अमेरिका ७, दक्षिण कोरिया ६ आणि भारतामध्ये १ व्यक्तीचा कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये ४ हजार ७२७ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. युरोपातील इटली स्पेन, जर्मनी, फ्रान्स या देशांमधीलही कोरोनाचे रुग्ण लक्षणीयरित्या वाढले आहेत. युरोप कोरोना विषाणूच्या प्रसाराचे नवे केंद्र तयार झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
पाकिस्तानमध्ये मागील २४ तासात कोरोनाचे रुग्ण तिप्पट वाढल्याचे समोर आले आहे. सिंध प्रांतामध्ये १०० पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. भारतामध्ये आत्तापर्यंत ३ जणांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोनाची तपासणी करून घेण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.