नवी दिल्ली -बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. कोरोना विषाणू उत्तर प्रदेशमध्ये झपाट्याने पसरत असून चिंतेची बाब आहे. कोरोना जुगाडाद्वारे नाही. तर योग्य उपाययोजना केल्यास अटोक्यात येईल, अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर केली.
'कोरोना जुगाडाद्वारे नाही, तर योग्य उपाययोजना केल्यास आटोक्यात येईल' - मायावतींचा योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल
बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. कोरोना जुगाडाद्वारे नाही, तर योग्य उपाययोजना केल्यास आटोक्यात येईल, असे त्या म्हणाल्या.
लोकसंख्येनुसार गरीब व मागासलेल्या उत्तर प्रदेशात कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. ही गंभीर चिंतेची बाब आहे. राज्य आणि केंद्र सरकारलाही याबाबत अत्यंत सजग असण्याची गरज आहे. कोरोना जुगाडद्वारे नाही. परंतु योग्य व्यवस्थेद्वारे नियंत्रित केले जाऊ शकतो, असे टि्वट मायावती यांनी केले आहे.
दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 49 हजार 247 वर पोहचली आहे. तर 1 हजार 146 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तसेच 29 हजार 845 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 18 हजार 256 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.