नवी दिल्ली -कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. जगभरात 1,84,000 हून अधिक लोकांना याची लागण झाली असून, सात हजारांहून अधिक लोकांचा यात बळी गेला आहे. तसेच, सुमारे 80 हजार लोक यातून बरेही झाले आहेत. भारतामध्ये तब्बल 151 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. कोरोना विषाणूसंबंधीच्या सर्व ताज्या बातम्या पहा एका क्लिकवर...
- तेलंगाणामध्ये 7 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.
- 'राज्यात 45 रुग्ण कोरोनाग्रस्त, पुणे, मुंबई अन् रत्नागिरीत आढळले 3 कोरोना रुग्ण
मुंबई - कोरोना विषाणू बाधीत रुग्णाचा आकडा महाराष्ट्रात 45 वर पोहचला आहे. पिंपरी-चिंचवड, रत्नागिरी आणि मुंबईमधून प्रत्येकी 1 असे 3 कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत.
- कोरोना दहशत : वैष्णोदेवी यात्रेला स्थगिती
नवी दिल्ली -कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहता श्री माता वैष्णोदेवी यात्रेला देखील स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याचबरोबर जम्मू-काश्मीरहून येणारी व जाणारी आंतरराज्यीय बस सेवेवर देखील निर्बंध लावण्यात आले आहेत.
नवी दिल्ली - भारतामध्ये 151 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, भारताबाहेर ज्या देशांमध्ये कोरोना जास्त प्रसार झाला आहे, तेथे तब्बल 276 भारतीयांना कोरोनाची लागण झाली आहे. हा आकडा भारतात संसर्ग झालेल्यांपेक्षा जास्त आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी लोकसभेमध्ये आज माहिती दिली.
नवी दिल्ली -'दर शंभर वर्षांनी महामारी येते. कलियुगात आपण विषाणूचा सामना करू शकत नाही. मानवाची दुर्बलता यातून दिसून येते. तुम्ही सर्व प्रकारचे शस्त्रे तयार करू शकता, मात्र, विषाणूशी तुम्ही लढू शकत नाही. असा परिस्थितीला आपण आपल्या स्तरावर लढा दिली पाहिजे, कोरोना विषाणूच्या प्रसारावर असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी व्यक्त केले आहे.
#Coronavirus: 'भाजप एक महिना कोणतंही आंदोलन करणार नाही'
नवी दिल्ली -देशभरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आत्तापर्यंत देशात`151 रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य आणिबाणीच्या पार्श्वभूमीवर भाजपने एक महिना देशभरात कोठेही आंदोलन, प्रदर्शन न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कोणत्याही आंदोलनात भागही घेणार नाही. भाजप अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी याबाबत माहिती दिली.