नवी दिल्ली -देशात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येत्या २६ मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना इफेक्ट : राज्यसभा निवडणुका पुढे ढकलल्या - राज्यसभा निवडणुका पुढे ढकलल्या
कोरोना विषाणूचा देशात प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर देशातील राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी होणाऱ्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
संसद
हेही वाचा...औरंगाबादेतील 'पॉझिटीव्ह' महिलेची कोरोनावर मात; डिस्चार्ज मिळाल्यानंतर डॉक्टरांचे मानले आभार
येत्या २६ मार्च रोजी विविध राज्यात राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी निवडणुका पार पडणार होत्या. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. अद्याप नव्या निवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.