महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'सर्वांना नव्हे, तर फक्त गरीबांना कोरोना लस मोफत', मध्य प्रदेश सरकारचा निर्णय

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी राज्यातील गरीब लोकांना कोरोना लस मोफत देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी याबाबत टि्वट केले आहे.

सिंह
सिंह

By

Published : Oct 23, 2020, 5:53 PM IST

भोपाळ -बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात नागरिकांना मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन दिले होते. त्यापाठोपाठ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी राज्यातील गरीब लोकांना कोरोना लस मोफत देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी याबाबत टि्वट केले आहे.

देशात कोरोना लसीवर चाचणी सुरू झाल्यापासून, आपल्याला करोना लसीचा खर्च परवडेल का? असा प्रश्न गरिबांना पडला आहे. त्यामुळे कोरोनावर लस तयार झाल्यानंतर राज्यातील गरीब नागरिकांना मोफत देण्यात येईल आणि ही कोरोनाविरोधातील लढाई आपण जिंकू, असे शिवराज सिंह म्हणाले.

याचबरोबर तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनीही कोरोना लस मोफत देण्याची घोषणा केली आहे. पुद्दुकोट्टाई जिल्ह्यात माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी ही घोषणा केली.

बिहार निवडणुकीच्या जाहीरनाम्यात नागरिकांना मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिवसेना, काँग्रेससह इतर पक्षांनीही भाजपावर टीका केली आहे. केंद्रात सत्ता आहे म्हटल्यावर देशातील प्रत्येक राज्य आणि प्रत्येक नागरिक हा भाजपासाठी समान असायला पाहिजे. मात्र, एकाच राज्यातील लोकांवर जास्त उदार होणे, हे केवळ निवडणुकीपुरते आहे का? असा संशय विरोधकांनी व्यक्त केला आहे.

देशात कोरोनाचा प्रसार अद्यापही होत आहे. मात्र, आता नव्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. या आठवड्यात पहिल्यांदाच नव्या रुग्णांची संख्या 50 हजारांच्या खाली आली आहे. देशात सध्या 7 लाखांपेक्षा जास्त कोविड अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर एक लाख 16 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात कोरोनावर लस बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून अद्याप लस तयार झालेली नाही. विविध देशांच्या लसीची चाचणी सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details