नवी दिल्ली - कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. चीनमध्ये अनेक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने लोकांच्या मनात कोरोनाविषयी भिती निर्माण झाली. यातच दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयातील एका कोरोना संशयित रुग्णाने येथील रुग्णालयाच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली आहे.
धक्कादायक! दिल्लीत कोरोना संशयित रुग्णाने केली आत्महत्या
कोरोना संशयित रुग्णाने सफदरगंज येथील रुग्णालयाच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली आहे.
कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. जगभरात 1,84,000 हून अधिक लोकांना याची लागण झाली असून, सात हजारांहून अधिक लोकांचा यात बळी गेला आहे. तसेच, सुमारे 80 हजार लोक यातून बरेही झाले आहेत. भारतामध्ये तब्बल 151 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.
दरम्यान सरकारने कोरोना विषाणूने मृत्यू झालेल्या रुग्णाच्या कुटुंबीयांना 4 लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे, असे आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने केले आहे. सरकारकडून नागरिकांसाठी 24 तास उपलब्ध असलेला हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे.