कोटा (राजस्थान) -राजस्थान येथील कोटामध्ये ज्यूस पिणाऱ्या 9 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आयआयटीच्या कोचिंग क्लासेसाठी प्रसिद्ध असलेले शहर म्हणजे कोटा. या शहरामध्ये आतापर्यंत 608 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच पुणे येथील आयटी कंपनीत काम करणाऱ्या युवकालाही कोटा येथे कोरोनाची लागण झाली आहे. 24 वर्षांचा हा युवक पुण्याहून दिल्लीपर्यंत विमानाने आला होता. दिल्लीमधून त्याने राजधानी एक्सप्रेसने कोटापर्यंत प्रवास केला. त्यानंतर त्याला रेल्वे जंक्शनवर तपासण्यात आले होते.
ज्यूस पिणाऱ्या नऊ जणांना एकसाथ कोरोनाची लागण - कोटा शहरात कोरोनाचे रुग्ण
राजस्थान येथील कोटामध्ये ज्यूस पिणारे 9 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आयआयटीच्या कोचिंग क्लासेससाठी प्रसिद्ध असलेले शहर म्हणजे कोटा.
ज्यूस पिणाऱ्या नऊ जणांना एकसाथ कोरोनाची लागण
राजस्थानमधील कोरोना परिस्थिती -
राजस्थानध्ये शुक्रवारी सकाळी 91 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या 16 हजार 387 झाली आहे. आतापर्यंत 380 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत साडेसात लाख नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, 12 हजार 658 रुग्ण बरे झाले आहेत.
Last Updated : Jun 26, 2020, 2:53 PM IST