चेन्नई (तामिळनाडू) -येथील एका 42 वर्षीय कोरोना बाधित महिलेने मंगळवारी एक मुलीला जन्म दिला आहे. या कोरोना बाधित महिलेला येथील आरएसआरएम सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या नवजात मुलीचे वजन 2.8 किलो आहे. ती पूर्णपणे सुरक्षित आहे.
या महिलेला तिच्या पतीपासून कोरोनाची लागण झाली होती. तिच्या पतीने मार्चमध्ये दिल्ली येथील एका धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यानंतर 30 मार्चला तो कोरोना बाधित असल्याचा अहवाल आला होता. पतीच्या कोरोना निदानानंतर, त्याची पत्नी आणि दोन मुलांना कोरोनाची बाधा झाली. यानंतर परिवारातील या तिघांना चेन्नईतील स्टॅनलि रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गेल्या 3 एप्रिलपासून तिच्यावर उपचार सुरू होते. यानंतर 16 एप्रिलला प्रसूतीसाठी शासकीय आरएसआरएम रूग्णालयात पाठवण्यात आले.