नवी दिल्ली - दिवसेंदिवस देशातील कोरोनाचा उद्रेक वाढत असून मागील चोवीस तासात 95 हजार 735 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तसेच एक हजार 172 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशभरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 44 लाख 65 हजार 864 झाली आहे. यामधील 9 लाख 19 हजार १८ अॅक्टिव्ह केसेस आहेत. उपचार पूर्ण झाल्याने आतापर्यंत 34 लाख 71 हजार 784 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. तर, देशभरात आता पर्यंत 75 हजार 62 मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे.
देशात कोरोनाचा उद्रेक, 44 लाखांचा टप्पा पार, चोवीस तासात 95 हजार 735 'पॉझिटिव्ह' - covid in india
दिवसेंदिवस देशातील कोरोनाचा उद्रेक वाढत असून मागील चोवीस तासांत 95 हजार 735 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तसेच एक हजार 172 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशभरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 44 लाख 65 हजार 864 झाली आहे.
देशात दररोज कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील काही दिवसांपासून सरासरी 90 हजार रुग्ण दररोज नव्याने आढळत आहेत. यातच आज हा आकडा 95 हजारांच्या वर गेल्याने चिंतेत भर पडली आहे. सध्या जगभरात भारताचा दुसरा क्रमांक आहे. मागील आठवड्यात भारताने ब्राझिलला मागे टाकले. आता जगात सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत असून त्याच्या खालोखाल भारताचा क्रमांक आहे.
दरम्यान, काल बुधवारी देशात तब्बल 89 हजार 706 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 43 लाखांवर गेली. मात्र मागील चोवीस तासांत हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. यासोबतच बुधवारी दिवसभरात एकूण 1,115 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 73 हजार 890 झाली.