नवी दिल्ली -भारतात गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गात मोठी वाढ झाली आहे. गेल्या दिवसभरात तब्बल 9 हजार 987 कोविड-19चे नवे रुग्ण सापडले आहेत. तर, मागील 24 तासांत 331 कोरोना बाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली.
देशातील कोरोना संसर्गाची स्थिती गंभीर बनली आहे. आत्तापर्यंत देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 66 हजार 598 वर पोहोचला आहे. यापैकी एक लाख 29 हजार 215 जण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे किंवा ते इतर ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. सध्या देशात एक लाख 29 हजार 917 अॅक्टिव्ह केसेस असल्याची नोंद आहे. तर, मृतांचा आकडा सात हजार 466वर पोहोचला आहे, असे मंत्रालयाने सांगितले.