महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशातील 'या' 15 राज्यांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ - अ‌ॅक्टिव्ह रुग्णसंख्या वाढली भारत कोरोना

गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 5 हजार 760 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 62 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर 4 हजार 88 रुग्णांना डिस्चार्ज दिला असून आतापर्यंत 16 लाख 47 हजार 4 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. राज्याचा रिक्व्हरी रेट 92.82 असून मृत्यू दर हा 2.62 आहे.

india corona
भारत कोरोना

By

Published : Nov 22, 2020, 3:53 PM IST

नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाचा प्रसार झाला असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगडसह एकूण 15 राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये 45 हजार 209 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 90 लाख 95 हजार 807 झाली आहे. तर 501 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या 1 लाख 33 हजार 227वर पोहोचली आहे. देशभरातील राज्यनिहाय आकडेवारी पाहता महाराष्ट्रात सर्वांत जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

सक्रिय रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी

गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 5 हजार 760 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 62 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर 4 हजार 88 रुग्णांना डिस्चार्ज दिला असून आतापर्यंत 16 लाख 47 हजार 4 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. राज्याचा रिक्व्हरी रेट 92.82 असून मृत्यू दर हा 2.62 आहे. तर 5 लाख 22 हजार 819 होम आयसोलेशनमध्ये तर 4 लाख 569 जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

हेही वाचा -देशातील रुग्णसंख्या 90 लाख 50 हजार; तर मृत्यू दर 1.47वर

देशात 4 लाख 40 हजार 962 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत तब्बल 85 लाख 21 हजार 617 जण कोरोनामुक्त झाले आहे. गेल्या 24 तासांत 43 हजार 493 जणांना डिस्चार्ज दिला आहे. देशातील रिकव्हरी रेट 93.69 टक्के असून तर मृत्यू दर 1.46 टक्के एवढा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details