रतलाम(मध्य प्रदेश) - भारतीय रेल्वेच्या बोगींमध्ये आयसोलेशन वार्ड तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर आयसोलेशन वार्ड तयार करायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमिवर रतलाम रेल्वे मंडळातदेखील आयसोलेशन वार्ड तयार करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. याठिकाणी रेल्वे कर्मचारी आणि अभियंते दिवसरात्र मेहनत करत आहेत. रेल्वेच्या एका स्लीपर कोचमध्ये डॉक्टर, मेडीकल स्टाफच्या केबीनशिवाय इतर 8 केबिन, कोरोनाबाधित रुग्णांसाठी तयार करण्यात येत आहेत. रेल्वे बोगीला रुग्णालयाच्या आयसोलेशनमध्ये रुपांतरीत करण्याचे काम सुरू आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारपर्यंत हे आयसोलेशन कोच तयार होतील. देशभरात ज्याठिकाणी गरज असेल,तिथे रेल्वे पाठवण्यात येतील.
रतलाममध्ये रेल्वेच्या बोगी होणार आयसोलेशन वॉर्ड, काम जोरात सुरू - ratlam
भारतीय रेल्वेच्या बोगींमध्ये आयसोलेशन वार्ड तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर आयसोलेशन वार्ड तयार करायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमिवर रतलाम रेल्वे मंडळातदेखील आयसोलेशन वार्ड तयार करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे.
रतलाम रेल्वे मंडळ
सध्या 9 कोच तयार करण्यात येत आहेत. देशात स्थिती आणखी बिकट झाल्यास आणि आयसोलेशन वार्डची गरज भासल्यास वापर करता यावा, यासाठी भारतीय रेल्वेने 80 हजार बोगींना आयसोलेशन वॉर्ड बनविण्याचा निर्णय घेतला आहे. या कामात रतलाम रेल्वे मंडळातील रेल्वे कर्मचारी आणि अभियंते महत्वाची भूमिका बजावत आहेत.