मेरठ- बिजनौरमधील कोरोनाबाधित डॉक्टरचा उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला. यानंतर मेरठमधील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आठवर पोहोचली. मृत्यू झालेल्या डॉक्टरच्या पत्नी आणि मुलाचा अहवालदेखील कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरला 27 एप्रिलला मेरठमधील मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केले गेले होते.
शहर कंटेनमेंट झोन घोषित
गेल्या दोन दिवसांपासून वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या पाहता शहर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. मेरठमध्ये सोमवारी 26 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यानंतर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 167 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण नवीन भाजीपाला बाजारात आढळले आहेत. यानंतर जिल्हा प्रशासनाने हा बाजार तीन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरात 34 हॉटस्पॉट क्षेत्र
जिल्ह्यात आता 34 ठिकाणे कोरोना हॉटस्पॉट म्हणून घोषित झाली आहेत. सोमवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेल्या वाढीनंतर 5 नवे हॉटस्पॉट समोर आले आहेत. ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत ते परिसर सील करण्यात आले आहेत. हे सर्व परिसर सॅनिटाइज केले जाणार आहेत.