महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोना : 72 तासांमध्ये उभारले 250 खाटांचे रुग्णालय - coronavirus outbreak

गुजरातमध्ये 72 तासांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालय उभारण्यात आले आहे.

CORONA HOSPITAL BUILT WITH 250 BED-FACILITY-IN-SURAT-IN-JUST-72-HOURS
CORONA HOSPITAL BUILT WITH 250 BED-FACILITY-IN-SURAT-IN-JUST-72-HOURS

By

Published : Mar 25, 2020, 3:25 PM IST

सुरत - देशांमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून 562 वर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पोहचली आहे. या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये 72 तासांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालय उभारण्यात आले आहे.

शहरातील माजुरा गेट जवळ हे रुग्णालय उभारण्यात आले आहे. रुग्णलयात 250 खाट आहे. सुरतचे माजी जिल्हाधिकारी महेंद्र पाटील यांच्या निगराणीखाली रुग्णालय उभारण्यात आले. आरोग्य मंत्री कुमार कानानी यांनी रुग्णालयाची पाहणी केली आहे.

भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५६२ झाली आहे. तर आतापर्यंत यामुळे ९ जणांचा बळी गेला आहे. या ५६२ पैकी ५१२ 'अ‌ॅक्टिव्ह केसेस' असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तसेच, ४० रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले.

दरम्यान मोदींनी कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी मंगळवारी मध्यरात्रीपासून ते येत्या १४ एप्रिलपर्यंत म्हणजेच 21 दिवस नागरिकांना जेथे आहे, तेथेच घरामध्ये थांबण्यास सांगितले आहे. महामारीमुळे २१ दिवस देश बंद ठेवण्याची ही देशातील पहिली वेळ आहे. कोरोनाला हरविण्यासाठी घरात राहण्याचा संकल्प करण्याचे आवाहन मोदींनी देशवासियांना केले आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून घराच्या बाहेर निघण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details