महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिल्ली : कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने दिल्ली सरकार चिंतेत - अरविंद केजरीवाल

दिल्लीत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे केजरीवाल सरकार पुढील अडचणी वाढत असून दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली.

satyendra jain
आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन

By

Published : Apr 2, 2020, 2:00 PM IST

नवी दिल्ली :दिल्लीसह देशात कोरोनाचा प्रादुर्बाव वाढतच आहे. यामुळेच सर्वसामान्य लोकांप्रमाणेच सरकारच्या देखील चिंतेत वाढ झाली आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री संत्येंद्र जैन यांनी गुरुवारी जेव्हा माध्यमांसोबत याबाबत चर्चा केली, तेव्हा कोरोनामुळे सरकारची चिंता अधिकच वाढली असल्याचे दिसून आले.

हेही वाचा...देशात चर्चा ! हे 'मरकझ' आणि 'तबलिगी जमात' म्हणजे नेमकं काय?

दिल्लीतील 152 पैकी 53 रुग्ण मरकझ येथील

बुधवारी संध्याकाळ पर्यंत दिल्लीत एकूण 152 रुग्ण कोरोनासंशयित असल्याचे आढळले. त्यातील 53 रुग्ण हे निजामुद्दीन मरकझ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. तसेच त्यांनी दिल्लीत काल 32 रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह झाले होते, त्यापैकी 29 रुग्ण हे मरकझला गेले होते, अशी माहिती दिली. यातूनच दिल्लीतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास मरकझ देखील कारणीभूत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

कोरोनाचा दिल्लीत प्रभाव वाढतो आहे...

ही संख्या अधिक वाढण्याची भीती...

आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी, आमच्याकडे संशयित आणि पॉझिटिव्ह रूग्णांसह एकूण सुमारे 700 कोरोनाची प्रकरणे असल्याचे सांगितले. तसेच, आजही बऱ्याच लोकांचे कोरोना चाचणी अहवाल येत आहेत. जेव्हा हे अहवाल येतील तेव्हा ही संख्या अधिक वाढण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.

हेही वाचा...रुग्णालयाच्या चुकीमुळे ३ दिवसाच्या बाळाला कोरोनाची लागण, पालिकेकडून रुग्णालय सील

एमसीडी रुग्णालयातील डॉक्टरांना अजून कोणतेही आदेश नाही...

काल संध्याकाळी एमसीडी च्या बाडा हिंदूराव रुग्णालयातील डॉक्टरांनी कोरोनाचे उपचार करण्याचा नकार दिल्याची बातमी आली होती. यावर सत्येंद्र जैन यांनी, एमसीडी चे कोणतेही रुग्णालय कोरोनाच्या उपचारासाठी तैनात केले नाही. ते अगोदरच विनाकारण त्रस्त झाले असल्याचे जैन यांनी म्हटले. तसेच, दिल्ली सरकारची रुग्णालये सध्या चांगल्या प्रकारे काम करत आहेत. सध्याचा काळ हा युद्धाचाच बनला आहे. मात्र, काही जण युद्धा अगोदरच अशा प्रकारची वक्तव्ये करत आहेत. कदाचीत ही एक अफवा देखील असू शकते, असेही जैन यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details