महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'कोरोना संकट जास्त काळ राहणार नाही, लवकरच लस तयार होईल'

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात मागील 24 तासांत सर्वात जास्त म्हणजे 11 हजार 929 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

नितीन गडकरी
नितीन गडकरी

By

Published : Jun 14, 2020, 9:33 PM IST

नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाचा फैलाव वाढत असतानाच हे संकट जास्त काळ राहणार नसून लवकरच लस तयार होईल, असा विश्वास केंद्रिय रस्ते वाहतून मंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'गुजरात जनसंवाद रॅली'ला गडकरींनी संबोधित केली. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.

'कोरोना संकट जास्त काळ राहणार नाही. आपल्या देशातील आणि इतर देशातील वैज्ञानिक रात्रंदिवस लस शोधण्याचे काम करत आहेत. मला विश्वास आहे की, लवकरच आपल्याला लस मिळेल, असे गडकरी म्हणाले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात मागील 24 तासांत सर्वात जास्त म्हणजे 11 हजार 929 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. देशातली कोरोनाग्रस्तांनी 3 लाखाचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या 3 लाख 20 हजार 922 झाली आहे.

मागील 24 तासात 311 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत 9 हजार 1965 जण कोरोनामुळे दगावले आहेत. तर 1 लाख 49 हजार 348 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे 1 लाख 62 हजार 379 जण उपचारानंतर पुर्णत: बरे झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details