नवी दिल्ली - देशभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ३५ हजार ४३ झाला असून १ हजार १४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ८ हजार ८८९ रुग्ण उपचारानंतर पूर्णत: बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
CORONA UPDATE : देशात २४ तासांत १ हजार ९९३ नवे रुग्ण; बाधितांचा आकडा ३५ हजार ४३ वर - कोरोना लाईव्ह बातमी
मागील २४ तासांत १ हजार ९९३ वने रुग्ण आढळून आले असून ७३ जणांचा मृत्यू झाला आहे.
एकूण रुग्णांपैकी २५ हजार ७ अॅक्टिव्ह केस आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. महाराष्ट्रात तर १० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. लॉकडाऊमुळे लहान, मध्यमस्वरुपाच्या उद्योगांचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. त्यांच्यासाठी मदत जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारच्या बैठका सुरू आहेत.
तर मागील २४ तासांत १ हजार ९९३ वने रुग्ण आढळून आले असून ७३ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याचा दर आता २५.१९ टक्के आहे. प्रमाणित नियमावलीनुसार नागरिकांची RTP-CR चाचणीच करण्यात येत असल्याचे अगरवाल यांनी सांगितले.